प्रतिनिधी /बेळगाव
वडगावची ग्रामदेवी मंगाई देवीची यात्रा मंगळवार दि. 26 जुलै रोजी भरणार आहे. यात्रेसाठी वडगाव परिसरातील नागरिकांकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. यावषी मोठय़ा उत्साहात यात्रा साजरी करण्यासाठी मंगाई देवीचे हक्कदार, मानकरी आतापासून नियोजन करीत आहेत.
बेळगाव परिसरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून मंगाई देवीची यात्रा ओळखली जाते. हजारो भाविक मंगाई देवीच्या दर्शनासाठी यात्रा काळात दाखल होत असतात. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे यात्रेवर निर्बंध आले होते. परंतु यावषी मोठय़ा उत्साहात यात्रा आयोजित करण्यात आली असल्याचे मंगाई देवस्थान कमिटीच्यावतीने कळविण्यात आले आहे.