वैज्ञानिक देखील आश्चर्यचकित
वैज्ञानिकांनी एका प्राचीन मंदिराखाली रहस्यमय गुहांचा शोध लावला आहे. हे मंदिर 3 हजार वर्षे जुने आहे. पुरातत्वतज्ञांच्या एका पथकाने प्राचीन मंदिराखाली या रहस्यमय गुहांचा शोध लावला आहे. पेरूच्या अँडीजमध्ये मंदिराखाली या गुहा सापडल्या आहेत. या प्राचीन मंदिराचे नाव चाविन डी हुआंतर आहे. एकेकाळी हे मंदिर पूर्ण भागातील धार्मिक आणि प्रशासकीय केंद्र होते.
मंदिरांच्या चकवा देणाऱ्या परिसरापेक्षा या गुहा अधिक जुन्या आहेत. हे मंदिर समुद्रसपाटीपासून 3200 मीटरच्या उंचीवर आहे. अनेक वर्षांच्या उत्खननानंतर 35 भुयारांबद्दल समजले आहे. परस्परांशी जोडलेल्या भुयारांची निर्मिती ख्रिस्तपूर्व 200 सालच्या आसपास करण्यात आली होती. ही भुयारे अत्यंत वेगळी असून त्यांची निर्मिती वेगळ्य़ा पद्धतीने करण्यात आली आहे. चाविन डी हुआंतारला 1985 मध्ये जागतिक वारसास्थळ घोषित करण्यात आले होते.
वैज्ञानिकांनी स्पेनमध्ये देखील एका रहस्यमय गुहेचा शोध लावला आह. प्राचीन मानवाच्या अनेक पिढय़ा या रहस्यमय गुहेत राहिल्या असाव्यात असे वैज्ञानिकांचे मानणे आहे. दक्षिण स्पेनच्या मलागा नावाच्या ठिकाणी ही गुहा आहे. या गुहेचे नाव कुएवा डी आर्डलेस आहे. या गुहेच्या भिंतींवर प्राचीन कलाकृती, रेखाचित्र आणि चित्रे तयार करण्यात आली आहेत.