नवी दिल्ली
गॅस वितरण कंपनी आयआरएम एनर्जी लिमिटेडचा आयपीओ 18 ऑक्टोबर रोजी खुला होणार आहे. कंपनीला या आयपीओच्या मदतीने 545.40 कोटी रुपये उभारण्याचे ध्येय असल्याचे कंपनीने सांगितले आहे. किरकोळ गुंतवणुकदारांना 20 ऑक्टोबरपर्यंत आयपीओसाठी बोली लावण्याची संधी असणार आहे. कंपनीचे समभाग हे 31 ऑक्टोबर रोजी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये सुचीबद्ध होणार असल्याची माहिती आहे.
सदरच्या आयपीओसाठी किरकोळ गुंतवणूकदारांना किमान एका लॉटसाठी अर्ज करावा लागणार आहे. यामध्ये 29 समभाग असून ते खरेदी करावे लागणार आहेत. कंपनीने आयपीओची किंमत 480 ते 505 प्रति समभाग इतकी ठेवली आहे. गुंतवणूकदारांना 505 च्या आयपीओच्या वरच्या प्राईस ब्रँडनुसार 1 लॉटसाठी अर्ज केल्यास 14,645 ची गुंतवणूक करावी लागणार असल्याची माहिती आहे. किरकोळ गुंतवणूकदार यामध्ये जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावू शकणार असल्याचे संकेत आहेत.