दोघे संशयित जाळय़ात ः तरुणांचे बेनवॉश करत असल्याचे स्पष्ट
कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने हावडा येथील टिकियापारा परिसरातून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. मोहम्मद सद्दाम (28) आणि सय्यद अहमद (30) अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. दोघांनाही स्थानिक न्यायालयात हजर केले असता 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ते आयएसआयएस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. केंद्रीय तपास यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही अटक करण्यात आल्याची माहिती एका वरि÷ पोलीस अधिकाऱयाने शनिवारी दिली. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एक एमटेक इंजिनिअर असल्याचेही त्यांनी सांगितले.
अटक करण्यात आलेले दोघेही सोशल मीडियावर देशविरोधी कारवाया आणि कट्टरतावादाला प्रोत्साहन देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. लोकांचे ब्रेनवॉश करून त्यांना जिहादी कारवायांकडे आकर्षित करणे हा त्यांचा उद्देश होता. देशविरोधी भावना भडकवण्यासाठी ते स्फोट आणि हत्याकांडाचे व्हिडीओ दाखवत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी पकडलेले हे दोन्ही आरोपी पाकिस्तान आणि पश्चिम आशियातील आयएसमधील बडय़ा नेत्यांच्या संपर्कात होते. एसटीएफच्या पथकाने शुक्रवारी रात्री दोघांना टिकियापारा येथील आफताबुद्दीन मुन्शी लेन येथील त्यांच्या लपून बसलेल्या ठिकाणावरून पकडले. त्यांनी खिदिरपूर येथे गुप्त बैठकीची योजना आखली होती, अशी माहितीही एसटीएफला मिळाली. अटकेनंतर त्योच्या घराची झडती घेण्यात आली. यात त्यांच्याकडून एक लॅपटॉप, दोन मोबाईल, डेबिट कार्ड्स जप्त करण्यात आले आहेत. एजन्सीने त्यांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तपास यंत्रणा सखोल चौकशी करत आहे. त्यांच्या जाळय़ात अनेक तरुण फसल्याचे दिसत आहे अटकेदरम्यान दोघांकडून अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच आरोपी शस्त्रांचा साठाही करत असल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय पैसे गोळा करण्याचे कामही ते करत असत. या सर्व प्रकरणांची चौकशी सुरू आहे.