या ठिकाणी जाण्यास वैज्ञानिक देखील देतात नकार
जगात अनेक रहस्यमय जागा असून त्यांच्याबद्दल जाणून घेतल्यावर लोकांना प्रथमदर्शनी विश्वासच बसत नाही. चहुबाजूने प्रशांत महासागराने वेढले गेलेल्या एका ठिकाणाचे नाव पॉइंट निमो आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या बेटावर अद्याप वैज्ञानिक पोहोचू शकलेले नाहीत. मानवी वस्तीपासून हजारो किलोमीटर अंतरावरील या ठिकाणी जाणे सोपे नाही.
पृथ्वीच्या या रहस्यमय ठिकाणी चहुबाजूला केवळ नीरव शांतता आहे. 1992 मध्ये एका सर्व्हे इंजिनियरने पॉइंट निमोचा शोध लावला होता. या इंजिनियरचे नाव हर्वोज लुकातेला होते. या ठिकाणी कुठलीच वनस्पती नाही. तसेच येथे अंतराळातील खराब उपग्रहांना पाडविले जाते. उपग्रहाच्या इंधनाला पाडविण्यासाठी देखील याच ठिकाणाचा वापर केला जातो. या बेटावर हजारो उपग्रहांचे अवशेष विखुरले गेले आहेत. समुद्राच्या मधोमध्य असलेल्या पॉइंट निमोला समुद्राचे केंद्र देखील मानले जाते.
हे ठिकाण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडदरम्यान आहे. विशेष बाब म्हणजे या बेटावर कुठल्याच देशाचा अधिकार नाही. या बेटापासून 2700 किलोमीटर अंतरावर भूमी आहे. हे जगातील सर्वात एकाकी ठिकाण असल्याचे मानले जाते, कारण येथे कुठलीच जीवसृष्टी आढळून येत नाही.
वैज्ञानिकांनी 1997 मध्ये पॉइंट निमोच्या पूर्व दिशेतून एक रहस्यमय आवाज ऐकला होता. हा आवाज सुमारे 2 हजार किलोमीटर अंतरावरून ऐकला गेला होता. या आवाजामुळे वैज्ञानिकांसमोर मोठं कोड निर्माण झाले आहे. हा आवाज नेमका कशाचा होता हे वैज्ञानिकांना अद्याप शोधून काढता आलेले नाही. हा आवाज दुसऱया जगतातील होता असे काही लोकांचे मानणे आहे. हा भयानक आवाज ऐकल्यावर वैज्ञानिकांनी या बेटावर जाण्यास नकार दिला आहे.