गेल्या ५ वर्षात माझ्याकडून जनतेसाठी केलेले कार्यच माझ्यासोबत आहेत असे बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.
मला सुरुवातीपासून मतदारसंघात चांगला प्रतिसाद आहे. मतदारसंघातील कोणत्याही कानाकोपऱ्यात नजर फिरविले माझ्या हातून घडलेले विकास कार्य दिसून येतील. ताई तुमच्यामुळे आमच्या गावाला रास्ता झाला. गटार झाले आणि गावचा विकास झाला असे ग्रामस्थ मला सांगत आहेत.
कोरोना, महापूर सारख्या कठीण परिस्थितीत मी जनतेसोबत उभी होते. कोरोनाकाळात माझा परिवार देखील कोरोनाग्रस्त झाला होता पण जनतेला याची जाणीव करून न देता, आमचे एक विशेष पथक जनसेवेत तत्पर होते. जनतेला मोफत अँब्युलेन्स, रेशनकिट, मेडिसिनकिट देण्यात आले होते. मी स्वतः इस्पितळात उपचार घेताना जनतेच्या सेवेसाठी हजर होते.
माझ्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतारलेल्यांना मी शत्रू मानत नाही. मी केलेले कार्य पाहून अनेकजण निपक्षपाती माझ्यामागे ठामपणे उभे आहेत.या प्रचारादरम्यान त्या महागाई धोरण, डी-मॉनिटाईजेशन, शिक्षक नियुक्ती, आदी मुद्द्यांवर त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.
याप्रसंगी त्यांचे बंधू व एमएलसी चन्नराज हट्टीहोळी व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.