नवी दिल्ली : आयटीसी लिमिटेडने लहान मुलांच्या देखभालीसंबंधीत असणारा ब्रँड ‘मदर स्पर्श’मध्ये 13.50 कोटी रुपयांची आणखी गुंतवणूक केली आहे. यासंदर्भात शेअर बाजाराला कंपनीने ही माहिती दिली आहे. सदरच्या गुंतवणुकीनंतर कंपनीची हिस्सेदारी ही 16 टक्क्यांनी वधारुन 22 टक्क्यांच्या घरात पोहोचणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. यावेळी आयटीसीने म्हटले आहे, की मदर स्पर्शमध्ये हिस्सेदारी वाढल्यानंतर हा पहिला टप्पा राहणार आहे, की वाढत जाणाऱया व्यवसायामध्ये आणखी वृद्धी करण्यासाठी योजना आखणार असल्याचेही नमूद केले आहे. मदर स्पर्श 90 ते 100 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Previous Articleजीव आणि शिव ही एकाच ईश्वराची दोन रूपे आहेत असे समज
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.