चित्रपटात दिसणार पितापुत्रीची जोडी
धडक, द कारगिल गर्ल गुंजन सक्सेना आणि गुड लक जेरी यासारख्या चित्रपटांद्वारे लोकांची मने जिंकलेली अभिनेत्री जान्हवी कपूरच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर आला आहे. मिली असे नाव असलेल्या या चित्रपटाचा फर्स्ट लुक जान्हवीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या चित्रपटात जान्हवी एका नर्सच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
या चित्रपटात जान्हवी स्वतःचे वडिल आणि प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांच्यासोबत मोठय़ा पडद्यावर पहिल्यांदाच झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. तर चित्रपटात मनोज पाहवा तिच्या पित्याची भूमिका साकारत आहेत. एका संकटातून पिताकन्येची ही जोडी कशाप्रकारे बाहेर पडते हे दर्शविणारा हा चित्रपट असणार आहे. ‘मिली’ सर्व्हाइवल ड्रामा धाटणीचा चित्रपट असून तो मल्याळी चित्रपट ‘हेलेन’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात जान्हवी आणि मनोज पाहवा यांच्यासोबत बोनी कपूर तसेच सनी कौशल देखील दिसून येणार आहेत. हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.