भूकंपाच्या हादऱयांनी घरे-इमारती कोसळल्या ः रस्त्यांना तडे, पूल उद्ध्वस्त, त्सुनामीचा इशारा
टोकियो, तैपेई / वृत्तसंस्था
गेल्या 24 तासात तीनवेळा भूकंप झाल्याने तैवान हादरले आहे. रविवारी सकाळी 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. त्यानंतर रविवारी दुपारी 7.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याने मोठी हानी झाली आहे. तैवानबरोबरच जपानही भूकंपाने थरथरला आहे. या नैसर्गिक आपत्तीचे व्हिडीओ आणि छायाचित्रे व्हायरल झाली असून त्यातून भूकंपाची तीव्रता मोठी असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानलाही काही प्रमाणात फटका बसला असून दोन्ही देशांमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपामुळे तैवानमधील अनेक रस्त्यांना तडे गेले असून काही पूल कोसळल्याचे छायाचित्रांवरून दिसून आले आहे. तसेच बऱयाच ठिकाणी अनेक इमारतीही झुकलेल्या स्थितीत किंवा कोसळल्या आहेत.
तैवानच्या आग्नेय किनारपट्टीला रविवारी भूकंपाचा धक्का बसला. तैवानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व भागातील तायतुंग काऊंटी भूकंपाचे मुख्य केंद्र असून शनिवारी याच भागात 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. तैवान हे बेट दोन टेक्टोनिक प्लेट्सच्या जंक्शनजवळ असल्यामुळे येथे भूकंप होण्याची शक्यता सर्वाधिक असते. जपानच्या बाबतीतही तशीच स्थिती असते. तथापि, येथील घरे-इमारतींची रचना भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींशी अनुकूल अशीच केल्यामुळे फारशी जीवितहानी होताना दिसत नाही.
तैवानमधील भूकंपाचा फटका अनेक घरे-इमारती आणि सरकारी मालमत्तेला बसला आहे. पूल कोसळल्याने काही वाहनेदेखील अडकल्याची माहिती मिळत आहे. तसेच डोंगली स्थानकावर रेल्वे रुळावरुन खाली घसरली. तसेच रेल्वेस्थानकाचे छतही कोसळले आहे. सेंट्रल न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, युली शहरातील इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. भूकंपामुळे घरातील पंखे, लाईट्स, पलंग, भांडी आदी साहित्य कोसळतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तसेच रस्त्यांवरील वाहने, रेल्वेमार्गांवरील रेल्वेही भूकंपाच्या हादऱयाने मोठय़ाने हलल्याचे दिसून आले आहे.
लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना
स्थानिक वेळेनुसार रविवारी दुपारी 2 वाजून 44 मिनिटांनी भूकंपाचा सर्वात मोठा धक्का जाणवला. या धक्क्यामुळेच सर्वाधिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्राथमिक टप्प्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त देण्यात आले नव्हते. तरीही संभाव्य धोक्यांमुळे येथील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले होते. नजिकच्या एक-दोन दिवसात त्सुनामीची स्थिती उद्भवल्यास मोठय़ा जीवितहानीची शक्यता गृहीत धरून लोकांना सावध करण्यात आले आहे.
तैवान ‘रिंग ऑफ फायर’वर स्थित
तैवानला भूकंप होण्याची शक्मयता असते कारण हे बेट दोन टेक्टोनिक प्लेट्सच्या जंक्शनजवळ आहे. तैवान व्यतिरिक्त पापुआ न्यू गिनी, न्यूझीलंड, वानुआतु आणि इतर पॅसिफिक बेटांवर भूकंपाचा धोका नेहमीच असतो. हा प्रदेश रिंग ऑफ फायरजवळ स्थित आहे. येथील समुद्राभोवती भूकंपाच्या फॉल्ट लाईनची घोडय़ाच्या नालेच्या आकाराची मालिका आहे.