सीरिजमध्ये दिसणार जबरदस्त प्रेमाची कहाणी
प्रेम आणि गुन्हेगारीत अडकलेल्या रोमान्सला दर्शविणारी सोनी लिव्हची सीरिज ‘जहानाबाद-ऑफ लव्ह अँड वॉर’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पॉलिटिकल बॅकड्रॉपदरम्यान प्रेमाची कहाणी दर्शविणाऱया या वेबसीरिजमध्ये अनेक ट्विस्ट आणि टर्न दिसून येतील. या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
स्टुडिओ नेकस्टच्या बॅनर अंतर्गत निर्मित या सीरिजचे दिग्दर्शन सुधीर मिश्रा यांनी केले आहे. या सीरिजमध्ये अभिमन्यू सिंह आणि कस्तुरी मिश्रा यांची प्रेमकहाणी दर्शविण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये हिंदी भाषिक पट्टय़ातील गुन्हेगारी तसेच राजकारण यांच्यातील साटंलोटं तसेच एका प्रेमकथेला एकत्र गुंफण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
जहानाबादचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ही प्रेमकथा 3 फेब्रुवारी रोजी सोनी लिव्हवर दर्शविण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये परमव्रत चट्टोपाध्याय, रजत कपूर, सुनील सिन्हा, सत्यदीम मिश्रा, राजेश जैस आणि सोनल झा यांचा अभिनय दिसून येणार आहे.