कारवार : ग्राहक बनून आलेल्या महिलांनी शिरसी येथील पाच रस्त्यावरील ओंकार ज्वेलर्स दुकानामधील लाखो रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. त्या तीन चोर महिलांनी केलेली हातचलाखी दुकानातील सीसीटीव्हीवर कैद झाली आहे. चोर महिला गदग येथील असल्याचे सांगण्यात आले. ग्राहक बनून आलेल्या महिलांनी हुषारी दाखवत दुकानमालकाचे लक्ष अन्यत्र वेधले आणि सोबत आणलेल्या पिशवीतून सोन्याचे दागिने लंपास केले. महिलांना ताब्यात घेतल्यानंतर किती रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला आहे याचा तपशील मिळणार आहे. शिरसी शहर पोलीस ठाण्यात प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पीएसआय अधिक तपास करीत आहेत.
Previous Articleअधिकाऱ्यांकडून मर्जीतील कॉन्ट्रॅक्टरला काम
Next Article मणिपूरमधील हिंसाचाराची सीबीआय चौकशी करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.