सावंतवाडी / प्रतिनिधी
आतापर्यत हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस १३२ जागांवर आघाडीवर तर भाजप फक्त ६६ जागांवर आघाडीवर तर किंगमेकर बनू पाहणारा जेडीएस फक्त २२ जागांवर आघाडीवर आहेत . कर्नाटकात भाजप दारुण पराभवाच्या छायेत असताना सावंतवाडी काँग्रेसने छत्रपती शिवाजी पुतळा ,उभा बाजार मसुरकर दुकानाच्या शेजारी व त्याचबरोबर शहरात ठीक ठिकाणी फटाके फोडून आनंद साजरा केलाय. यावेळी जेष्ठ काँग्रेस पदाधिकारी श्री राजू मसुरकर, युवा नेते समीर वंजारी व सर्व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .