खानापूर : भाजपने मोदींच्या दूरदृष्टीतून देशाचा कायापालट केला आहे. मोदी यांना पुढील पाच वर्षात भारत जगात महासत्ता बनवायची आहे. मजबूत अर्थव्यवस्था आणि देशातील ग्रामीण भागाचा विकास हेच मोदींचे ध्येय आहे. यासाठी मोदींचे हात बळकट करण्यासाठी भाजपला निवडून देणे गरजेचे आहे, असे वक्तव्य जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांच्या कक्केरी जिल्हा पंचायत क्षेत्रातील प्रचारसभेवेळी केले. यावेळी विठ्ठल हलगेकर, किरण यळळूरकर, अॅङ हेरेकर यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कक्केरी जिल्हा पंचायत क्षेत्रातील बिडी, गस्टोळी, द•ाr, लिंगनमठ, भुरुणकी यासह इतर खेड्यातून प्रचार दौरा केला. यावेळी कक्केरी जि. पं. क्षेत्रातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण जिल्हा पंचायत क्षेत्रात भाजपमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांनी आपल्या वाहनातून कार्यकर्त्यांसह रॅली काढली. तसेच मतदारांच्या भेटीगाठी घेऊन भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रत्येक गावात कोपरा सभा घेण्यात आली. कार्यकर्त्यांनी व मतदारांनी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे साथ देण्याचे आश्वासन दिले आहे. य् ाावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद कोचेरी, वसंत तिप्पनावर, कृष्णाजी गावडे, यल्लापा नलवडे, विठ्ठल हेरेकर, प्रमुख कार्यकर्ते, युवक, महिला व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Articleकाँग्रेसकडून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम
Next Article केंद्र सरकार हे कामगार विरोधी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.