सरपंच मधेच ग्रामसभा सोडून आपल्या केबिनमध्ये
वार्ताहर /कामुर्ली
मेगा प्रकल्पाच्या मुद्द्यावरून कामुर्ली पंचायतीच्या ग्रामस्थेत जोरदार खडाजंगी झाली. संतप्त ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार करत पंचायत मंडळाला धारेवर धरले.अखेर संरपंच सरपंच पांडुरंग खोर्जूवेकर यांना सभा सोडून आपल्या केबिनमध्ये जावे लागले. कामुर्ली पंचायतीची ग्रामसभा रविवार दि. 29 रोजी स. 10.30 वा. पंचायत सभागृहात आयोजित केली होती. ग्रामस्थ संजय वायंगणकर यांनी ग्रामसभेबद्दल जास्तीजास्त लोकांना माहिती मिळण्यासाठी पंचायतीने ग्रामसभेपूर्वी ध्वनिक्षेपकाद्वारे सर्व ग्रामस्थांना माहिती द्यावी. त्यावर सरपंच खोर्जुवेकर यांनी पंचायतीकडे फंड नसल्याने गाडी भाड्याने घेऊन ध्वनिक्षेपकाद्वारे लोकांना माहिती देणे शक्य नाही. ग्रामसभेची प्रसिद्धी करण्यासाठी दोन हजार ऊपये खर्च करून करू शकत नाही काय?, असा सवाल माजी सरपंच शरद गाड यांनी करून आश्चर्य व्यक्त केले.
मागील ग्रामसभेत मेगा प्रकल्पासाठी रस्ता बांधण्यात आला होता, त्याची माहिती घेऊन संबंधित खात्याला दोन दिवसांत उत्तर देण्यात येईल, असे पंचायत मंडळातर्फे सांगण्यात आले होते. मात्र आजपर्यंत त्याची कार्यवाही का नाही झाली ? तसेच पंचायतीतर्फे तपासणीसुद्धा केली नाही याचा अर्थ काय? डिसेंबर 2021मध्ये ठराव घेण्यात आला होता की पंचायतीने दिलेला नाहरकत दाखला मागे घेणार असे सांगितले होते मात्र पण आजपर्यंत त्याची कार्यवाही का झाली नाही? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. यावर यावेळी पंचायत मंडळाने 2005 साली तत्कालीन पंचायत मंडळाकडून दोन घरांसाठी दाखला देण्यात आला होता, पाणी रस्ता, वीजपुरवठा त्यावेळी देण्यात आली होती, हे प्रथम जाणून घ्या आणि नंतरच बोला सरपंच म्हणाले. मात्र या विषयावरून ग्रामस्थ खुपच आक्रमक झाल्याने पंचायत मंडळ व ग्रामस्थांत खडाजंगी झाली. अखेर पोलीस संरक्षणात सरपंच थेट उठून मध्येच ग्रामसभा सोडून आपल्या केबिनमध्ये जाऊन बसावे लागले. यावेळी वातावरण बरेच तापले होते. यावेळी ग्रामस्थ संतप्त झाले. आरजी संजय वायंगणकर व इतर पंचायतीच्या दारावरच ठाण मांडून बसले. उपस्थित ग्रामस्थांचे सरपंच पांडुरंग खोर्जुवेकर यांनी स्वागत केले. मागील सभेचा अहवाल वाचन सचिव राजकुमार चोडणकरनी वाचून दाखविला.