रिया कपूरच्या नव्या चित्रपटाची घोषणा
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर, क्रीति सेनॉन आणि तब्बू लवकरच ‘द क्रू’ नावाच्या एका नव्या चित्रपटात एकत्र दिसून येणार आहेत. चित्रपटाची निर्मिती रिया कपूरने सोशल मीडियाद्वारे याची अधिकृत घोषणा केली आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार असल्याचे तिने सांगितले आहे.
तीन वर्षांचे स्वप्न, लिहून काढल्यावर, प्लॅनिंक केल्यावर मी एकता कपूरसोब आमच्या ड्रीम कास्टला सादर करत आहे. तब्बू, करिना कपूर आणि क्रीति सेनॉनच्या ‘द क्रू’चे चित्रिकरण फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहे. राजेश कृष्णन याचे दिग्दर्शन करणार आहेत. निधी मेहरा आणि मेहुल सूरी यांनी पटकथा लिहिली आहे’ असे रियाने सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद पेले आहे.
‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटात रिया कपूरसाब्sात काम करताना खूप मजा आली होती. यावेळी ती माझ्याकडे या चित्रपटाची कथा घेऊन आली आणि ती मला अत्यंत आवडली आहे. या चित्रपटाची कथा खूपच चांगली आहे. चित्रपटासाठी रियाने तब्बू आणि क्रीति सेनॉन यांचीही निवड केली आहे. या दोघींसोबत काम करण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. हा चित्रपट ‘वीरे दी वेडिंग’चा सीक्वेल नसल्याचे करिनाने म्हटले आहे.
करिना कपूर सध्या ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी लंडनमध्ये आहे. या मर्डर मिस्ट्रीमधून करिना कपूर ओटीटीवर पदार्पण करणार आहे. या चित्रपटात करिनासोबत जयदीप अहलावत तसेच विजय वर्मा यासारखे कलाकार दिसून येणार आहेत.