मेल तसेच फीमेल देखील नाही
ब्रिटनमध्ये मांजराचे एक असे पिल्लू सापडले आहे, जे नर तसेच मादी देखील नाही. अशाप्रकारची घटना पहिल्यांदाच समोर आल्याने पशु चिकित्सक देखील चकित झाले आहेत. मांजराच्या या पिल्लावर पशूचिकित्सक नजर ठेवून आहेत. डॉक्टरांनुसार मांजराच्या पिल्लामध्ये कुठलेच अंतर्गत तसेच बर्हिगत लैंगिक अवयव नाही. प्रारंभी या पिल्लाला मादीच मानले जात होते. वॉरिंग्टनच्या कॅट्स प्रोटेक्शन रेस्क्यू सेंटरमध्ये या पिल्लाला ठेवण्यात आले होते.
पांढऱया रंगाचे हे मांजर केवळ 15 आठवडे वयाचे आहे. याला टैबी नाव देण्यात आले आहे. कॅट्स प्रोटेक्शनचे वरिष्ठ पशू चिकित्सक अधिकारी फियोना ब्रॉकबँक यांनी याला ऐजनेसिसचा प्रकार ठरविले आहे. एखादा अवयव पूर्णपणे नुपस्थित असेल किंवा शरीरात विशिष्ट पेशींची कमतरता असेल तेव्हा त्याला ऐजनेसिस म्हटले जाते.
काही एक्टोपिक ओवेरियन टिश्यूच्या आत लपलेले असू शकतात, परंतु हा प्रकार अत्यंत अशक्य आहे. या स्थितीसाठी प्रत्यक्षात सर्वसाधारपणे वापरला जाणारा कुठलाच शब्द नाही. आम्ही आणि आमच्या सहकाऱयांनी असा प्रकार पूर्वी कधीच पाहिलेला नाही असे उद्गार ब्रॉकबँक यांनी काढले आहेत.
अशा स्थितीतही मांजराचे हे पिल्लू तंदुरुस्त असून कॅट्स प्रोटेक्शन टाइनसाइड अडॉप्शन सेंटरमध्ये पुन्हा जाणार आहे. कॅट्स प्रोटेक्शनच्या इन्स्टाग्राम पेजने या मांजराचे छायाचित्र शेअर केले असून त्याला युजर्सकडून मोठी पसंती मिळत आहे. मांजराच्या पिल्लाची चांगली देखभाल केली जात असल्याचे सेंटरचे व्यवस्थापक बेनी बेनस्टेड यांनी म्हटले आहे.