आशुतोष राणा, पाउली दाम अन् सतीश कौशिकची सीरिज
डिस्ने प्लस हॉटस्टारने नव्या सीरिजची घोषणा केली आहे. या सीरिजचे नाव ‘कर्मयुद्ध’ असून यात आशुतोष राणा, सतीश कौशिक आणि पाउली दाम हे मुख्य भूमिका साकारत आहे. या सीरिजची कहाणी कोलकाता शहराची पार्श्वभूमी दर्शविणारी आहे.
सीरिजचे सर्व एपिसोड्स 30 सप्टेंबर रोजी डिस्ने हॉटस्टार प्लसवर प्रदर्शित केले जाणार आहेत. या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून यात ‘रॉयजसाठी सिटी ऑफ जॉय रक्तपातात बदलण्यात आले’ असे याच्या कॅप्शनमध्ये म्हटले गेले आहे. सीरिजमध्ये याचबरोबर जगदीश खट्टर, चंदन रॉय सान्याल, अंजना सुखानी देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.
डिस्ने प्लस हॉटस्टारवर यापूर्वी दहन-राकन का रहस्य ही सीरिज स्ट्रीम करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये टिस्का चोप्रा, सौरभ शुक्ला मुख्य भूमिकेत आहेत. तर क्रिमिनल जस्टिसचा तिसरा सीझन झळकला असून यात पंकज त्रिपाठी हे माधव मिश्रा ही लोकप्रिय भूमिका साकारताना दिसून आले आहेत.