अमेरिकेच्या वैज्ञानिकांकडून ‘सुपरड्रग’ तयार
दरवर्षी 70 लाख लोकांचा जीव वाचणार
अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी एक असे औषध विकसित केले आहे, जे सुपरबग्सच्या विरोधात उपयुक्त ठरू शकते. याचे नाव ’फॅबिमायसिन’ आहे. संशोधनादरम्यान हे औषध शेकडो बॅक्टेरिया संपविण्यास सक्षम आढळून आले आहे. हे सर्व बॅक्टेरिया सामान्य औषधांबद्दल रेसिस्टेंट आहेत.
सुपरबग एक असा बॅक्टेरिया, व्हायरस, पॅरासाइट किंवा फंगस आहे, ज्यावर अँटीबायोटिक औषधांचा कुठलाच प्रभाव होत नाही. एका जिवाणूचे सुपरबग होण्याचे मुख्य कारण अधिक प्रमाणात अँटीबायोटिक औषधे घेणे आहे. नॉर्मल बॅक्टेरियाचा क्रोमोजाम अँटीबायोटिक औषधाच्या प्रोटीन मॉलिक्यूल्सच्या विरोधात प्रतिरोधक क्षमता विकसित करत असतो. सुपरबगच्या संसर्गामुळे दरवर्षी 70 लाख लोकांचा मृत्यू हो असतो. हा प्रकार जागतिक तापमानवाढीइतकाच धोकादायक असल्याचे वैज्ञानिकांचे मानणे ओ.
फॅबिमायसिन एक मानवनिर्मित औषध असून याचे परीक्षण प्रथम उंदरांवर करण्यात आले. या औषधाने उंदरांमध्ये ड्रग-रेसिस्टेंट न्युमोनिया आणि युरिनरी ट्रक्ट्र इन्फेक्शनला (युटीआय) बरे केल्याचे वैज्ञानिकांना आढळून आले. यावर अधिक संशोधन केल्यावर हे औषध सुपरबग्सच्या 300 हून अधिक स्ट्रेन्सना संपविण्यास उपयुक्त असल्याचे दिसून आले.
औषधाचे 14 प्रकार
युनिव्हर्सिटी ऑफ इलिनोइसच्या वैज्ञानिकांनी फॅबिमायसिनचे 14 प्रकार तयार केले आहेत. हे त्वचा संसर्ग, ब्लड पॉइजनिंग आणि टॉक्सिक शॉक सिंड्रोम यासारख्या स्थिती निर्माण करणाऱया सुपरबग्सचा खात्मा करण्यास मदत करू शकते. या व्हर्जन्सचे उंदरांमध्ये 10 वेगवेगळय़ा बॅक्टेरियांवर परीक्षण करण्यात आले. यात ई कोली नावाचा बॅक्टेरियाही होता, जो युटीआयचे कारण ठरतो. याचबरोबर के. न्युमोरिया बॅक्टेरियावरही फॅबिमायसिनचे परीक्षण झाले, जो फुफ्फुसांमध्ये संक्रमण आणि न्युमोनियाचे कारण ठरतो.
सुपरबग्सचा धोका वाढतोय
अमेरिकेतील आरोग्य यंत्रणा सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार अँटीबायोटिक रेसिस्टेंटमुळे दरवर्षी अमेरिकेतच 28 लाख इन्फेक्शन्स होतात. यातील सुमारे 34 हजार जणांना जीव गमवावा लागतो. तर इंग्लंडमध्ये सुपरबग्समुळे दरवर्षी 61 हजार लोक प्रभावित होतात.