पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत अक्षय कुमार
अक्षय कुमारने स्वतःचा नवा चित्रपट ‘कठपुतली’चा फर्स्ट लुक शेअर केला आहे. यापूर्वी या चित्रपटाचे नाव ‘मिशन सिंड्रेला’ होते, जे आता बदलून ‘कठपुतली’ करण्यात आले आहे. निर्मात्यांनी याचा टीझर शेअर करत शनिवारी ट्रेलर प्रदर्शित करणार असल्याची घोषणा केली आहे.
अक्षयचा हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये नव्हे तर थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. अक्षयचे मागील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्याने त्याने ओटीटीचा मार्ग निवडला असल्याचे मानले जात आहे. कोरोना संकटकाळात अक्षयचे ‘लक्ष्मी’ आणि ‘अतरंगी रे’ हे चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित झाले होते.
‘कठपुतली’ हा एक क्राइम थ्रिलर चित्रपट असून तो डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रर्शित होणार आहे. 2 सप्टेंबरपासून हा चित्रपट पाहता येणार आहे. चित्रपटाचा टीझर शेअर करत अक्षयने ‘ये खेल पावर का नहीं बल्की माइंड का है और इस माइंड गेम में आप और में…सब कठपुतली होंगे’ असे नमूद केले आहे. अक्षय कुमार पुन्हा एकदा या चित्रपटाद्वारे पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तसेच या चित्रपटात सरगुन मेहताला मुख्य भूमिका मिळाली आहे. तर रंजीत तिवारी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. रंजीत तिवारी यांच्यासाब्sात अक्षयने यापूर्वी ‘बेल बॉटम’ या चित्रपटात काम केले होते.