हालगा टॉपटेन गावमर्यादीत शरीरसौष्ठव स्पर्धेला चांगला प्रतिसाद
बेळगाव : हालगा येथे कलमेश्वर व्यायाम शाळा बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कलमेश्वर श्री टॉपटेन गावमर्यादीत शरीरसौष्ठव स्पर्धेत किशन संताजी याने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर कलमेश्वर श्री किताबाचा मानकरी ठरला. तर संकेत येळ्ळूरकर याने उत्कृष्ट पोझरचा बहुमान मिळविला. हालगा येथे कलमेश्वर मंदीर येथे घेण्यात आलेल्या कलमेश्वर श्री टॉपटेन गाव मर्यादीत जवळपास 35 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हनुमान मूर्तीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
टॉपटेन निकाल पुढीलप्रमाणे
1) किशन संताजी 2) रितेश हनुमंताचे 3) कपिल कामाण्णाचे 4) पंकज कामाण्णाचे 5) राहुल हणंमताचे 6) कार्तिक चिकरप्पा 7) महेश कुरंगी 8) ऋशिकेश गोवेकर 9) रोहित लोहार 10) संकेत येळ्ळूरकर यानी विजेतेपद पटकाविले. बक्षिस वितरणप्रसंगी प्रसाद बसरीकट्टी, सदानंद बेळगोजी, सागर कामाण्णाचे, रेखा गणपती, रेणूका मन्नोळकर, किशोर चौगुले, लकी कुरंगी, भुजंग सालगुडे मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पदके, प्रमाणपत्र व भेटवस्तूने गौरवण्यात आले. यावेळी मारूती बेळगुचे, राकेश मोरे, मनोज बाळेकुंद्री, गोपी देसाई, प्रविण सामजी, आकाश बाळेकुंद्री, बबन संताजी, प्रकाश घोरपडे, आकाश सामजी, सुशांत बेळगोजी आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी अजित सिद्दण्णावर, एम. गंगाधर, हेमंत हावळ, सुनील राऊत, सुनील पवार, आकाश हुलीयार, सुनील अष्टेकर, हंगीरगेकर यांनी काम पाहिले.