विश्रुत चषक क्रिकेट स्पर्धेत झेवर गॅलरी – रॉयल्स सामना तहकूब
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित चंदन कुंदरनाड पुरस्कृत विश्रुत चिट्स चषक 13 वर्षाखालील मुलांच्या लिटिल मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात सामन्यात के. आर. शेट्टी किंग्ज संघाने रॉजर्स सुपर किंग्स संघाचा पराभव केला. तर झेवर गॅलरी डायमंड व एमसीसीसी रॉयल्स यांच्यात दुसरा सामना पावसामुळे सामना तहकूब करण्यात आला. युनियन जिमखाना पहिला सामन्यात केअर शेट्टी किंग्स संघाने रॉजर सुपर किंग संघाचा 6 गड्यांनी पराभव करत आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. रॉजर सुपर किंग संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 6 गडी बाद 109 धावा केल्या. त्यात साईराज चव्हाणने 3 चौकारांसह नाबाद 36, शाहऊख धारवाडकरने 2 चौकारांसह 18, विवान भूसदने 15 धावा केल्या. के.आर. शेट्टी किंग्ज तर्फे मोहम्मद अब्बासने 2 तर खंडू पाटील यांनी एक गडी बाद केला. प्रत्यंत्तरादाखल खेळताना के.आर. शेट्टी किंग्स संघाने 19.3 षटकात 4 गडी बाद 111 धावा करत हा सामना जिंकला. त्यात मोहम्मद अब्बास 5 चौकारांसह 28, प्रणव जे.ने 2 चौकारांसह 23, आदित्य हुंबरवाडी व स्वयंम खोत यांनी प्रत्येकी 16 धावा केल्या. रॉजर्स सुपर किंग तर्फे विश्रुत कुंदरनाडने 2 तर साईराज चव्हाण व जितिन दुर्गाई यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रमुख पाहुणे राजू केलगेरी प्रल्हाद चेन्नगिरी व जयवंत दुर्गाई यांच्या हस्ते यांच्या सामनावीर मोहम्मद अब्बास व इम्पॅक्ट खेळाडू साईराज चव्हाण यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. दुसऱ्या सामन्यात झेवर गॅलरी संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 षटकात बिनबाद 73 धावा केल्या असताना जोरदार पावसाला प्रारंभ झाल्याने सामना तहकूब करण्यात आला. त्यात कर्णधार मोहम्मद हमजा नाबाद 22 व अजय लमानी नाबाद 38 धावांवर खेळत होत.s हा सामना पुढे खेळण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.