पाचगाव वार्ताहर
आर के नगर परिसरातील गणेश नगर रुमालेमाळ येथील दीपक करमचंद रयत वय 50 या गृहस्थांनी शनिवारी रात्री राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. करवीर पोलीस स्टेशन मध्ये नोंद झाली आहे. दीपक रयत यांच्या पश्चात तीन भाऊ आणि एक बहीण आहे.