हुपरी कोल्हापूर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्यावर पोलिसांनी बेछूट लाठीचार्ज करत अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांचा व शासनाच्या. निषेधार्थ हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील सकल मराठा समाज्याच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला.यावेळी मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणार्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा काळे झेंडे दाखवत निषेध करण्यात आला.
पट्टणकोडोली येथील नविन बसस्थानक परिसरात आज पट्टणकोडोली सकल मराठा समाज्याने काळे झेंडे दाखवत रास्ता रोको करून झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला.समाज्याकडून मराठा समाज्याचे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्याला वाकणार नाही. आरक्षण आमच्या हक्काचे असल्याने ते हिरावण्याचा प्रयत्न करु नये अशा भावना व्यक्त करत समाज बांधवांनी शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी अध्यक्ष आण्णासो जाधव, सात्तापा भवान,सरदार सुरवशी ,उपसरपंच अमोल बाणदार, प्रकाश जाधव, राजू पवार, अनिल यादव मच्छिंद्र जाधव,निलेश कागले, प्रविण पोवार, किसन तिरपणकर , विजय हुपरे, संदिप दुर्गे, सतिश हुपरे,सचिन शिंदे,अजय जाधव व मराठा समाजनबांधव मोठया संख्येने उपस्थीत होते.