Kolhapur Rain Update : जांभळी व कासारी नद्यांच्या उगमक्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेले आहे.नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
बाजारभोगाव व पोहाळे (ता.पन्हाळा) दरम्यान, मोडका वड नावाच्या शेतातून गेलेल्या कोल्हापूर रस्त्यावर आडीच फुट पाणी आल्याने कोल्हापूर -अनुस्कूरा- राजापूर या राज्यमार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही सर्व वाहतूक बाजारभोगाव – पोहाळवाडी व पोहाळे या पर्यायी रस्त्याने सुरू आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.