राधानगरी, प्रतिनिधी
Radhanagri Dam Rain Update : राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर कायम असून, धरणाच्या पाणी पातळीत व साठ्यात वाढ होत आहे. काल रात्री पासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या सात स्वयंचलित दरवाज्याजवळ पाणी पोहचले असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकर धरण भरण्याची शक्यता आहे.
आज दुपारी चार पर्यत 82 मी. मी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत 1791 मी. मी नोंद करण्यात आली आहे. पाणी पातळी 336.55 फूट व पाणीसाठा 6427. 66 द. ल. घ. फू(6.15 टी एम सी) इतका आहे. खासगी जलविद्युत केंद्रातून 1400 क्यूसेकने विसर्ग भोगावती नदीत सुरू असून नदी दुधडी वाहत आहे. संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.