निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर चाेरी झाल्याने चर्चा
टाेप/प्रतिनिधी
टाेप येथील कल्लेश्र्वर व महालक्ष्मी दुध संस्था तसेच कल्लेश्र्वर महालक्ष्मी पतसंस्थेत रविवारी रात्री अज्ञातांनी कुलुप ताेडुन २९ हजार ८८१ रुपयेची व काही वर्षांचे प्रोसिडिंग चाेरी केल्याने निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ग्रामस्थांतुन चर्चा रंगू लागली आहे.
विशेष म्हणजे गाेकुळ दुध संघाचे संचालक डाॅ. सुजित मिणचेकर या संस्थेचे संचालक आहेत. चाेरट्यानी दवाजाचे कुलुप ताेडुन आत प्रवेश करत तिजाेरीचा दरवाजा उचकटुला असल्याचा प्रकार संस्थेचे कर्मचारी संतोष पाटील यांना साेमवारी सकाळी दुध संस्था उघडताना हा प्रकार लक्षात आला. यानंतर संस्थेचे चेअरमन संचालक मंडळाला हा प्रकार सांगितला.यानंतर शिराेली एम आय.डि.सी पाेलिसात संताेष पाटील यांने फिर्याद दिली. पाेलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार तिजाेरीचा व लाकडी कपाटाचा दरवाजा उचकटुन सन २०१७-१८ चे महालक्ष्मी दुध संस्थेचे प्राेसिडिंग बुक व दुध संस्था नाेटीस बुक तसेच सन २०१८-१९ चे कल्लेश्र्वर दुध संस्थेचे वाषिॅक सभेचे प्राेसेडिंग बुक व सन २०१९-२० या वर्षांचे मासिक प्रोसिडिंग बुक व राेख रक्कम २९८८१ रुपये कपाटातुन चाेरिला गेले आहे.अधिक तपास शिराेली पाेलिस करत आहेत.