बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित 14 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टॅलेंट स्पोर्टस हुबळी संघाने बीडीकेचा 6 गड्यांनी पराभव करून केएससीए चषक पटकाविला. 44 धावा व 1 गडीबाद करणाऱ्या अष्टपैलू अभिनव शर्माला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. केएससीए हुबळी मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात बीडीके हुबळी संघाने प्रथम फलंदाजी करताना 49.4 षटकात सर्व गडीबाद 149 धावा केल्या. त्यात प्रितम जी ने 5 चौकारासह 40, अकुल पत्तारने 4 चौकारासह 20, अबूरिहान पी.ने 13 धावा केल्या. टॅलेंट स्पोर्टसतर्फे अभिषेक एसने 23 धावात 4, तर अभिनव शर्मा, संदेश वातालकर, श्रीकांत बिदनाळ यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना टॅलेंटस स्पोर्टस संघाने 24.3 षटकात 4 गडीबाद 152 धावा करून सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात जॉय जेम्स सोल्लदने 13 चौकारासह नाबाद 73, अभिनव शर्माने 10 चौकारासह 44, तर कार्तिक अकशीमनी 2 चौकारासह 13 धावा केल्या. बीडीकेतर्फे निशांत कुरबर व प्रितम जेने यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केली. सामन्यानंतर मान्यवरांच्याहस्ते विजेत्या टॅलेंट व उपविजेत्या बीडीके संघाला गौरविण्यात आले. अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून शिवयोगी एम., चंद्रशेखर के, स्कोरल म्हणून विनय यांनी काम पाहिले.
Previous Articleडीवायईएसला ज्युडो स्पर्धेत सर्वसाधारण जेतेपद
Next Article कोनेवाडीचा पूल संरक्षक कठडे नसल्याने धोकादायक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.