10 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : बेंगळूर येथे सार्वजनिक शिक्षण खातेतर्फे घेण्यात आलेल्या 14 व 17 वयोगटातील प्राथमिक-माध्यमिक राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत बेळगावच्या डीवायईएस स्पोर्टस हॉस्टेलच्या ज्युडोपटूंनी 10 सुवर्ण, 3 रौप्य, 2 कास्यपदकासह 15 पदकांची कमाई करीत सर्व साधारण विजेतेपद पटकाविले. बेंगळूर येथे घेण्यात आलेल्या शिक्षण खात्याच्या राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत 14 वर्षाखालील प्राथमिक गटात मुलींमध्ये अश्वीनी तेनगलीने 23 किलो वजनी गटात सुवर्णपदक आलिया मुलत्नाने 44 किलो वरील गटात सुवर्ण पदक, करण कासरेकरने 45 किलो वजनी गटात कास्य पदक पटकाविले. तर 17 वर्षाखालील माध्यमिक गटात अमृता नाईकने 40 किलो वजनी गटात सुवर्ण पदक, श्वेता अलकनुरने 44 किलो वजनी गटात सुवर्ण, सहागुप्ताने 52 किलो वजनी गटात सुवर्ण, आफ्रीनने 27 किलो वजनी गटात सुवर्ण, संजना सेठने 63 किलो वजनी गटात सुवर्ण, निशा कंग्राळकरने 70 किलो वजनी गटात रौप्य पदक, गंगया चिक्कमठने 45 किलो वजनी गटात सुवर्ण, आर्यन डोंगलने 73 किलो वजनी गटात सुवर्ण, सुरज सावंतने 50 किलो वजनी गटात रौप्य, सुमूकने 66 किलो वजनी गटात रौप्य, कार्तिक पावसकरने 55 किलो वजनी गटात कास्य पदक पटकाविले. या गटातील सर्व सुवर्ण पदके विजेत्या खेळाडूंची जम्मू-काश्मिर व राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक ज्युडो संघात निवड झाली आहे. या सर्व ज्युडोपटूंना ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील, कुतूजा मुलात्नी यांचे बहुमूल्य मार्गदर्शन तर युवजन क्रीडा अधिकारी बी. श्रीनिवास यांचे प्रोत्साहन लाभत आहे.