प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडे-काकोडा नगरपालिकेत नुकतीच नगराध्यक्षपदी निवड झालेल्या जस्मिन ब्रागांझा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याधिकारी मनोहर कारेकर यांच्या उपस्थितीत पालिकेच्या स्थायी समिती तसेच अन्य समित्याची निवड करण्यात आली आहे. यावेळी उपनगराध्यक्षा रुचा वस्त, नगरसेवक विश्वास सावंत, सुशांत नाईक, प्रमोद नाईक, दामोदर बेणे, योलोंदा पेरेरा, रिमा एलिस, अपर्णा प्रभुदेसाई, क्लेमेंटिना फर्नांडिस, कार्मेलिना मोराईस व मंगलदास घाडी उपस्थित होते.
बैठकीत पालिकेच्या विविध समित्या निवडण्यात आलेल्या आहेत. माजी नगराध्यक्ष विश्वास सावंत यांनी आपल्या कार्यकाळात निवडलेल्या समित्यांत फक्त काही प्रमाणात बदल करण्यात आला असून कचरा समितीत नगराध्यक्ष या नात्याने आपण व सोबत उपनगराध्यक्षा आणि इतर सर्व नगरसेवकांना समाविष्ट करण्यात आले आहे. ज्या प्रकारे याअगोदर काम करण्यात आले त्याच प्रकारे आपणही काम करणार, अशी माहिती नगराध्यक्षा ब्रागांझा यांनी यावेळी दिली.