वृत्तसंस्था/ ऍकापुल्को (मेक्सिको)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या ऍकापुल्को पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत टॉप सीडेड जोडी वेस्ले कुलहॉफ आणि निल स्कुपेस्की यांनी दुहेरीची उपांत्यफेरी गाठताना सादियो डोंबिया आणि रिबॉल यांचा पराभव केला.
पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कुलहॉफ आणि स्कुपेस्की यांनी डोंबिया व रिबॉल यांचा 6-4, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. त्याचप्रमाणे ऑस्ट्रियाच्या इर्लेर व मिडर्लेर यांनी ब्लूमबर्ग व कास्पर रुड यांचा 6-4, 6-3 असा पराभव करत उपांत्यफेरी गाठली आहे.