कोल्हापूर प्रतिनिधी
मुल होत नसल्याने पती व सासुकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबलने गळफास घेवून आत्महत्या केली. योगिनी सुकुमार पवार (वय 36, रा.पोलीस लाईन कसबा बावडा) असे तीचे नाव आहे. कसबा बावडा येथील पोलीस लाईनमध्ये आज (रविवार) दुपारी ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की योगिनी पोवार २०११ सली कोल्हापूर पोलिस् दलामध्ये भरती झाल्या. सध्या त्या पोलिस नियंत्रण कक्षामध्ये नेमणुकीस होत्या. गेल्या काही दिवांपासून त्याचे पती सुकुमार यांच्यासोबत त्यांचे वाद होत होते. याच करणातून रविवारी सकाळी राहत्या घरामध्यये गळफास घेवून आत्महत्या केली. दुपारी ही घटना उघडकीस आली. यानंतर पोलिस दलामध्ये खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, शाहुपूरीचे राजेश गवळी यांनी लागलीच घटनास्थळाची पाहणी केली. आत्महत्या करण्यापूर्वी योगिनी पोवार यांनी लिहिलेली चिट्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली. पतीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यात म्हटले आहे.
या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे. दरम्यान शाहूपुरी पोलिसांनी योगिनीचे पती व सासुस ताब्यात घेतले आहे.