किरण राव दिग्दर्शकाच्या भूमिकेत
आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बॅनर अंतर्गत तयार होत असलेला चित्रपट ‘लापता लेडीज’चा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. लापता लेडीज चित्रपटात स्पर्श श्रीवास्तव, नितांशी गोयल, प्रतिभा रांटा, छाया कदम आणि रवि किशन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
या चित्रपटाद्वारे आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव दिग्दर्शक म्हणून 14 वर्षांनी पुनरागमन करत आहे. किरण राव यांनी यापूर्वी धोबी घाट या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा एक कॉमेडी ड्रामा धाटणीचा चित्रपट असून यात पत्नीसोबत रेल्वेतून प्रवास करणाऱ्या इसमाची कहाणी दाखविण्यात आहे. या इसमाची पत्नी प्रवासात हरविल्यावर तो पोलीस स्थानकात पोहोचून पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवित असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. चित्रपटात रवि किशन हे पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट 5 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कॉमेडी अन् ड्रामाने भरपूर असल्याचे निर्मात्यांनी म्हटले आहे.