30 मीटर लांब, वजन 50 टन
डायनासोरवरून मानवाची उत्सुकता नेहमीच राहिली आहे. अशा स्थितीत एखाद्या डायनासोरचे जीवाश्म मिळाल्यास सर्वांचा उत्साह वाढत असतो. अशाच एक लांब मान असणाऱ्या डायनासोरच्या जीवाश्माचा शोध अर्जेंटीनामध्ये संशोधकांनी लावला आहे. अर्जेंटिनाच्या दक्षिण पेंटागोनिया क्षेत्रात लांब मान असणाऱ्या शाकाहारी डायनासोरच्या एका विशाल नव्या प्रजातीचा शोध समोर आला आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी प्रजाती असल्याचे सांगण्यात येत आहे. प्यूबलो ब्लेंको नेचर रिझर्व्हमध्ये हे जीवाश्म आढळून आले आहेत.
या डायनासोरची हाडं अत्यंत मोठी असल्याने ती नेणारी व्हॅन देखील पलटली होती. वैज्ञानिकांनी या डायनासोरचे नाव ‘चुकोरोसॉरस डिरिपिएन्डा’ ठेवले असल्याची माहिती जीवाश्म तज्ञ निकोलस चिमेंटो यांनी दिली आहे. रियो नेग्रो प्रांतात पर्वतीय क्षेत्रात आलेला चुकारोसॉरस याला आतापर्यंतचा सर्वात मोठा डायनासोर मानले जात आहे. याची लांबी सुमारे 30 मीटर तर वजन 50 टनाच्या आसपास आहे. क्रिटेशस पीरियडमधील हा डायनासोर असावा असे वैज्ञानिकांचे मानणे आहे. क्रिटेशस पीरियड सुमारे 14.4 कोटी वर्षांपूर्वी सुरू झाला होता. चुकारोसॉरसचा फीमर बोन म्हणजेच जांघेकडील हाड सुमारे 1.90 मीटर लांबीचे अन् तीन तुकड्यांमध्ये होते. यातील प्रत्येक तुकड्याचे वजन सुमारे 100 किलो होते.
पेटोगोनिया शाकाहारी डायनासोरांचे केंद्र
जगातील सर्वात मोठे शाकाहारी डायनासोर म्हणजेच पेटागोटिटन मेयोरम जो वैज्ञानिकांनी पेटोगोनिया येथेच शोधला होता. काही डायनासोरच्या शरीराची वाढ आयुष्यभर थांबली नव्हती. चुकारोसॉरस एक साओरोपोड प्रजाती असून आकार आणि वजनाप्रकरणी अन्य पेटोगोटियनला ते टक्कर देत असल्याचे जीवाश्म तज्ञ मेटियस मोट्टा यांनी सांगितले आहे.
अर्जेंटीनात अनेक प्रजातींचा शोध
चीन आणि अमेरिकेनंतर अर्जेंटीनामध्येच सर्वाधिक संख्येत डायनासोरच्या प्रजातींचा शोध लागला आहे. अर्जेंटीनामध्ये एकूण 140 प्रजातींचा शोध लागला आहे. नॅशनल जियोग्राफिक सोसायटीच्या मदतीसोबत अजारा फौंडेशन तसेच नॅशनल रिसर्च कौन्सिल कॉनसेट आणि बर्नार्दिनो रिवादाविया म्युझियम ऑफ नॅशनल सायन्सच्या संशोधकांनी यावर अध्ययन केले आहे.