पूर्णवेळ हेच काम करते युवती
तुम्ही आतापर्यंत लोकांना स्वत:च्या गरजेनुसार गोष्टी भाड्याने घेतल्याचे पाहिले असेल. काही लोक घर किंवा अन्य गोष्टी भाड्याने घेत असतात. गरज भासल्यास वाहने देखील भाडेतत्वावर मिळविली जातात. पण आता एक युवती लोकांची गर्लप्रेंड म्हणून काम करते आणि याकरता मोठे शुल्क आकारते.
अनेक प्रकारच्या नोकऱ्यांबद्दल तुम्ही ऐकले असेल. कुणी घराच्या सफाईतून लाखो रुपये कमावत आहे, तर कुणी घरगुती कामगार म्हणून चांगले पैसे मिळवत आहेत. परंतु एक युवती दररोज एखाद्या नव्या युवकाची गर्लफ्रेंड होत प्रचंड पैसे कमावत आहे.
या युवतीचे नाव किर्मी असून ती मूळची जपानची रहिवासी आहे. दरदिनी कुठल्या न कुठल्या युवकाची गर्लफ्रेंड होऊन चांगले पैसे कमावत असल्याचा तिचा दावा आहे. ती पूर्णवेळ भाडेतत्वावर गर्लफ्रेंड होण्याचेच काम करते. तिच्या सोशल मीडियावर 2 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. किर्मी सध्या मेक्सिकोमध्ये वास्तव्यास आहे. ती स्वत:च्या चाहत्यांसोबत चित्रपट पहायला जाणे, डिनरवर जणे आणि शॉपिंग करण्यासाठी पैसे आकारते.
किर्मी प्रत्येक ग्राहकाकडून कमीतकमी 44 हजार रुपये आकारते, महिन्याकाठी तिची कमाई सुमारे 10 लाख रुपयांपर्यंत आहे. वर्षभरात ती 1 कोटी रुपयापेक्षा अधिक कमाई करत आहे. सर्वसाधारणपणे ती सिंगल असलेल्या युवकांनाच डेट करते.