यंदा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनतेतून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. गेल्यावेळापेक्षा सर्वाधिक मताधिक्याने निवडून येईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.गेल्याखेपेस मी मतदारसंघात आणि राजकारणाराचा अनुभव हा नवीन होता तरी देखील मला निवडणुकीत ५१ हजार मतांची आघाडी मिळून मी आमदार म्हणून निवडून आले. यंदा मतदारसंघात सौहार्दाचा संबंध आहे. अनेक विकास कामे राबविली गेली आहेत. त्यामुळे मला चांगला पाठिंबा मिळत आहे. महिलावर्गातून आदर आणि प्रेम तर वडिलधारी मंडळी यांच्याकडून आशीर्वाद मिळत आहे. माहेरपणाची वागणूक मिळते. बेळगाव ग्रामीण मतदारसंघ फक्त निवडणुकीसाठी मर्यादित नसून हा माझा परिवार आहे.
यंदाची विशेषतः म्हणजे मी माझा अधिकृत प्रचार सुरुकरण्याआधीच मतदारसंघातील जनता स्वयंस्फूर्तीने प्रचाराला सुरुवात केली. सोशियल मीडियाच्या माध्यमातून मी केलेल्या कार्याबद्दल कौतकाचा वर्षाव झाला आणि त्यामुळे अनेकांच्या पर्यंत माझे कार्य पोहचले. त्यामुळे मी निश्चिन्त होते. खेळीमेळीत कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना न घडता माझे प्रचार कार्य पूर्ण झाले. याबद्दल मी माझ्या मतदारांचे आभार मानते. १० मे रोजी बहुसंख्येने मतदान करून मला निवडणून आणण्याचे आवाहन केले.