कारगिल विजयाचे औचित्य साधून अण्णीगेरीत आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
मराठा लाईट इन्फंट्री व भारतीय पुरातत्त्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून अण्णीगेरी येथील एम. बी. हळ्ळी फर्स्ट गव्हर्न्मेंट ग्रेड कॉलेज येथे ‘तुमच्या सैन्याला जाणून घ्या’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. प्रमुख वक्ते म्हणून सुरेश बरगली उपस्थित होते. त्यांनी कारगिल युद्धावेळी सैन्यातील वीरांनी केलेला त्याग आणि त्यांचे योगदान याबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सैन्यात सहभागी होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे, याचे विवेचन केले. नायक सुभेदार नागराज तिलगंजी यांनी अग्निपथ योजना आणि भरती प्रक्रियेबाबत विवेचन केले.