कासेगाव वार्ताहर
वाळवा तालुक्यातील नेर्ले – येवलेवाडी चव्हाण वस्ती ते किरण शिंदे यांच्या शेतालगत शेतकऱ्यांना दोन दिवसांपूर्वी बिबट्या दिसला होता. याबाबत ग्रामस्थांनी वन विभागाला कळवले. वनाधिकारी सुरेश चरापले यांच्या मार्गदर्शनाखाली वनसेवक अनिल विठ्ठल पाटील यांनी पाहणी केली असता बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. तेव्हा शेतकऱ्यांनी शेतात येता जाता योग्य खबरदारी घ्यावी असे आवाहन वन विभागाकडून केले आहे. यावेळी सुयोग पाटील, राहुल पाटील, किरण शिंदे, सागर पाटील, सचिन रणखांबे, राहुल रणखांबे, किरण रणखांबे, संदीप कदम , अभिजीत मोहिते, दत्तात्रय विरकर उपस्थित होते. येवलेवाडी येथील ग्रामस्थ मृत जनावरे या रस्त्याकडेला टाकत असलेने येथे बिबट्याचा वावर आहे असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.