रशिया-युक्रेन युद्ध अद्याप कुठल्याही अंतिम निष्कर्षावर पोहेचलेले नाही. रशियाच्या सैनिकांनी युपेनमध्ये शेतजमीन, रस्त्यांसह सर्वठिकाणी भूसुरुंग पेरून ठेवले आहेत. अशा स्थितीत युक्रेनला भूसुरुंग शोधून काढत त्यांना निष्क्रीय करण्याचे आव्हान पेलावे लागत आहे. युक्रेनच्या महिलांना या परिस्थितीत कोसोवोमध्ये यासंबंधी विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे.
युक्रेनमध्ये इंग्रजीची शिक्षिका म्हणून काम करणाऱया अनास्तासिया मिनचुकोवा यांनी हे प्रशिक्षण घेतले आहे. स्फोटके ओळखून ती निष्क्रीय करण्याचे प्रशिक्षण त्यांनी मिळविले आहे. 20 वर्षीय मिनचुकोवा आणि पाच अन्य महिलांना कोसोवो येथे नेत भूसुरुंग आणि अन्य धोक्यांना निष्क्रीय करण्यासाठी एका अभ्यासक्रमात सामील करण्यात आले आहे. युद्ध समाप्त झाल्यावर त्यांना भूसुरुंग शोधून काढत ते निष्क्रीय करण्याचे काम करावे लागणार आहे.
भूसुरुंग आणि अन्य स्फोटके निष्क्रीय करणाऱया लोकांना मोठी मागणी आहे. युद्ध लवकरच सपंणार असून त्यानंतर आमचे काम खऱया अर्थाने सुरू होणार असल्याचे मिनचुकोवाने म्हटले आहे.
18 दिवसीय प्रशिक्षण शिबिर कोसोवोमधील पेजा शहरात पार पडले आहे. कोसोवोममध्ये 1998-99 दरम्यान अल्बानियन फुटिरवादी आणि सर्बियन सुरक्षा दलांदरम्यान मोठा संघर्ष झाला होता. यात सुमारे 13 हजार लोक मारले गेले होते.
युक्रेनसंबंधी स्फोटके निष्क्रीय करण्याचा विशेष अभ्यासक्रम या केंद्रात तयार करण्यात आला आहे. उच्च प्रशिक्षित आणि अनुभवी माइन ऍक्शन ऑपरेशन्स ऑफिसर अर्तुर तिगानी यांनी ही जबाबदारी पेलली आहे.