आता कर्नाटकात ऑल इंडिया रेडिओच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणि डिजिटल उपक्रम राबविण्यासाठी आकाशवाणीच्या माध्यमातून शाळांमध्ये धडे दिले जाणार आहेत. 23 फेब्रुवारीपासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे इयत्ता पहिली ते नववीपर्यंतचे विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकणार आहेत. योग, आरोग्य, करिअर शिक्षण गणित, मातृभाषा आणि इंग्रजी विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सोमवार ते गुरुवार पर्यंत राज्यातील १३ आकाशवाणी केंद्रे आणि ३ विविध भारती एफएम केंद्रांवरून दुपारी २.३५ ते ३.०० या वेळेत याचे प्रसारण होणार आहे. all india radio banglore – YouTube streaming आणि prasar bharati news on air app ऍप्प द्वारे श्रोते ऐकू शकतात.