नवी दिल्ली : भारतीय जीवन विमा निगमने (एलआयसी) धनवर्षा ही नवी योजना नुकतीच सादर केली आहे. ही योजना 17 ऑक्टोंबरपासून कार्यान्वित झाली आहे.
एकरकमी हप्ता भरून या योजनेमध्ये संबंधितांना सहभागी होता येणार असल्याची माहिती आहे. संरक्षणासह बचतीचा लाभ या पॉलिसीच्या माध्यमातून ग्राहकांना मिळू शकणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या 31 मार्च 2023 पर्यंत या योजनेमध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे. ‘सम ऍश्युरड ऑन डेथ’ आणि ‘बेसीक सम अश्युरड’ अशा दोन प्रकारांमध्ये ही पॉलिसी सादर होणार असून 10 किंवा 15 वर्षाच्या कालावधीसाठी योजना असेल. एखाद्यावेळी संबंधीत योजनाधारकाचा मृत्यु झाल्यास आवश्यक आर्थिक सहकार्य योजनेतून मिळणार आहे. काही तत्त्वावर योजनाधारकांना कर्जही देण्याची व्यवस्था एलआयसीची आहे. दहा वर्षाच्या कालावधीकरता योजना घेणाऱयांचे वय कमीत कमी 8 वर्षे तर 15 वर्षाची पॉलिसी घ्यायची असल्यास कमीत कमी वय 3 वर्षे असणे गरजेचे आहे. 35 ते 60 वर्षाचे व्यक्ती ही योजना घेऊ शकतात. ही योजना ऑफलाइन पद्धतीने एजंट किंवा इतर माध्यमातून घेता येणार आहे.