कणकिरे-गुळेली येथील दुर्दैवी घटना : गावकर कुटुंबावर मोठा आघात
प्रतिनिधी /वाळपई
कणकिरे-गुळेली येथे वीज वाहिन्यांवर आलेल्या झाडांच्या फांद्या छाटताना विजेचा शॉक लागून वीज खात्याच्या कर्मचाऱयाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी 11 वा. घडली. संजय गावकर (36) ठाणे असे त्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई व चार वर्षाची मुलगी आहे.
संजय गावकर यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता. जोपर्यंत त्यांच्या कुटुंबाच्या भवितव्याची जबाबदारी घेण्याबाबत वीजखात्याकडून लेखी आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. अखेर वीज खात्याचे कार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता यांनी उपस्थित होऊन नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्याचे मान्य केले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविण्यात आलेला आहे. वाळपई पोलिसांनी पंचनामा करून संजय गावकर यांचा अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
बुधवारी सकाळी झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम संजय गावकर व त्याचे इतर दोन सहकाऱयांनी सुरू केले होते. फांद्या छाटण्याचे काम सुरू असताना अचानकपणे त्यांना शॉक लागून ते खाली कोसळले. वाळपईच्या सामाजिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱयांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. संजय गावकर हे गेल्या आठ वर्षापासून वीज खात्यामध्ये हेल्पर म्हणून काम करीत होते. अत्यंत शांत स्वभाव व सर्वांशी मित्रत्वाचे संबंध निर्माण केले होते. संजय गावकर यांचा मृत्यू अनेकांना चटका लावणारा ठरला.
नातेवाईक आक्रमक झाल्याने तणाव
या दुखःद घटनेचे वृत्त सत्तरीत पसरताच नातेवाईक व खात्यातील कर्मचाऱयांनी वाळपईच्या सरकारी सामाजिक रुग्णालयात गर्दी केली. वीज खात्याच्या अधिकाऱयांकडून करण्यात आलेला निष्काळजीपणामुळे संजय यांच्यावर मृत्यू ओढवला, असा आरोप करत नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली यामुळे काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.
पत्नीला नोकरी देण्याची मागणी
संजयच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याला चार वर्षाची मुलगी आहे. आई, पत्नी व मुलगी असा त्यांचा परिवार आहे. संजय गावकर यांच्या मृत्यूमुळे सदर गावकर कुटुंबावर मोठे संकट निर्माण झाले आहे. एकमेव कमवता आधार आता गेल्यामुळे कुटुंबाचे पालनपोषण कसे होणार, असा प्रश्न उपस्थित करून नातेवाईकांनी खात्याच्या वरि÷ अधिकाऱयांनी यासंदर्भातील लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी लावून धरली. जोपर्यंत संजयच्या पत्नीला सरकारी नोकरीत समावून घेण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाइकांनी घेतली.
वाळपईचे सहाय्यक अभियंता दीपक गावस व कार्यकारी अभियंत्यांनी नातेवाईकांचे समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जवळपास दोन तास चर्चा केल्यानंतर शेवटी वरि÷ अधिकाऱयांनी या संदर्भातील कागदोपत्री व्यवहार शक्मय तेवढय़ा लवकर करून ते सरकार दरबारी पाठवण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद
संजय गावकर यांच्या मृत्यूबाबत अजूनपर्यंत कुणाकडून तक्रार आलेली नाही. ही घटना अनैसर्गिक म्हणून नोंदविण्यात आल्याचे वाळपई पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते यांनी सांगितले. या संदर्भात तपास सुरू असून वीज कार्यालयाच्या अधिकाऱयांकडून यासंदर्भात अधिक माहिती मिळाल्यानंतर निश्चित या प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अचानकपणे शॉक लागण्याचे कारण अस्पष्ट
संजय गावकर यांना अचानक शॉक लागून जागीच गतप्राण होण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र ज्या वीज वाहिन्यांवर ते काम करीत होते, त्या वाहिन्या नादुरुस्त होत्या. त्यातून अचानक विजेचा प्रवाह सुरु झाल्यामुळे संजय यांचा जीव गेल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. या संदर्भात सहाय्यक अभियंता दीपक गावस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या संदर्भात कारणे अजूनपर्यंत स्पष्ट झालेली नाहीत.