बाजार समिती निवडणुकीत नावे परस्पर बदलल्याने वाद : काँग्रेसमध्येही नाराजीचा सूर
सांगली प्रतिनिधी
सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपच्या पॅनेलमधील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यावऊन भाजपात मोठा वाद उफाळला. सोसायटी गटातील नावे परस्पर बदलल्याने जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर आरोप करत पॅनेलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे काँग्रेसमध्येही मिरज तालुक्यातील उमेदवार बदलल्याने नाराजीचा सूर उमटला आहे. दोन्ही पॅनेलमध्ये नाराजी उफाळल्याचे स्पष्ट झाले आहे.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 28 एप्रिल रोजी मतदान होत आहे. यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे (ठाकरे गट) यांची महाविकास आघाडीचे वसंतदादा पाटील शेतकरी विकास पॅनेल तर विरोधी भाजपचे शेतकरी परिवर्तन पॅनेल तसेच तिसरी आघाडी अशी निवडणूक होत आहे. खरी लढत महाविकास आघाडी व भाजपमध्ये होणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये जत तालुक्यातून भाजप पॅनेलचे नेते खा. पाटील व जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला जबर धक्का दिला आहे.
सावंताना बदलुन चौगुलेच्या नावावरून स्फोट
महाविकास आघाडी आणि भाजप पॅनेलच्या उमेदवारांची नावे शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली, यादीनंतर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली, जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी सोसायटी गटातून जत भाजपा अध्यक्ष प्रमोद सावंत यांचे नाव परस्पर खासदार संजयकाका आणि प्रकाश जमदाडे यांच्या गटाने नाव बदलून त्याठिकाणी बिळुर गटातील चिदानंद चौगुले यांना उमेदवारी दिली, यादीत बदल केल्याची माहिती समजताच जगताप यांनी संताप व्यक्त करीत भाजपा पॅनेलमधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. दरम्यान जत तालुक्यातील भाजपाच्या बहुतांशी नेत्यांच्या मागणीनुसार चौगुले यांना उमेदवारी दिल्याचे संजयकाका व जमदाडे यांनी सांगितले.
संजयकाकांचा जत आणि कवठेमहांकाळमध्ये आघाडीला दे धक्का
महाविकास आघाडीमध्ये ज्यांना संधी मिळाली नाही, मात्र ज्यांची ताकद आहे, अशा जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भाजपने संधी दिली आहे. यामध्ये जत तालुक्यातून काँग्रेसचे माजी सभापती सुनील चव्हाण यांचे चिरंजीव दिग्विजय चव्हाण यांना आर्थिक दुर्बल गटातून, आमदार विक्रम सावंत यांचे कट्टर समर्थक आणि बाजार समितीचे माजी सभापती यांच्या मातोश्री निलिमा पाटील यांना महिला राखीवमधून राष्ट्रवादीचे मोहन कुलकर्णी यांना सोसायटी गटातून उमेदवारी दिली आहे, तर कवठेमहांकाळ तालुक्यातील सगरे गटाचे जीवन भोसले, माजी पंचायत समिती सदस्य दीपक ओलेकर यांच्या पत्नी भारती ओलेकर यांना उमेदवारी दिली.
मिरजमधून काँग्रेसने उमेदवार बदलला
महाविकास आघाडीतून शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या गटातील महावीर पाटील यांच्या उमेदवारीवऊन वादंग सुऊ होते. अखेर अनेकवेळा चर्चा केल्यानंतर शुक्रवारी उमेदवार बदलण्यात आला. त्यांच्या ऐवजी ा†मरज तालुक्यातील एरंडोलीचे बाबगोंड पाटील यांना उमेदवारी दिली.
महाविकासला कपबशी, भाजपला विमान
उमेदवार निश्चित झाल्यानंतर शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चिन्ह वाटप करण्यात आले. चिन्ह वाटपात महाविकास आघाडीला कपबशी, भाजपला विमान तर तिसऱ्या आघाडीला नारळ असे चिन्ह वाटप करण्यात आले, तर अपक्षांना चिन्ह वाटप करण्यात आली आहेत.