वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एटीके मोहन बागान फुटबॉल संघातील फुटबॉलपटू लिस्टन कुलासोची इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील 2022 च्या फुटबॉल हंगामातील सर्वोत्तम भारतीय फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली. अखिल भारतीय फुटबॉलपटू संघटनेतर्फे हा पुरस्कार देण्यात येत आहे.
हैदराबाद एफसी संघातील फुटबॉलपटू ओगबेची याची 2022 च्या फुटबॉल हंगामातील सर्वोत्तम विदेशी फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे हैदराबाद एफसी संघाचा आकाश मिश्रा याची 2022 च्या फुटबॉल हंगामातींल सर्वोत्तम युवा फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. मॅन्युअल मारक्वेज यांची सर्वोत्तम फुटबॉल प्रशिक्षक निवड करण्यात आली. महिलांच्या विभागात अंजु तमंगची 2022 च्या फुटबॉल हंगामातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून निवड झाली आहे तर मनिषा कल्याणची सर्वोत्तम युवा महिला फुटबॉलपटूंसाठी निवड करण्यात आली.