राज्यपाल श्रीधरन पिल्लाई : पेडणे तालुक्याच्या दौऱयात घेतले भगवती देवीचे दर्शन
प्रतिनिधी /पेडणे
गोवा हा निसर्गसंपन्न असून त्यावर प्रेम करा. निसर्गसंपन्ना जपण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवा. स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपापल्या परिसराचा विकास करताना जनमानसात आपले स्थान पक्के करावे. गावच्या ज्या समस्या, जनतेचे प्रश्न असतील ते प्रश्न व्यवस्थीत हाताळून त्यांना न्याय द्यावा, असे आवाहन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लाई यांनी केले.
राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लाई यांनी मंगळवार दि. 26 रोजी सकाळी पेडणेतील श्री भगवती देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते स्थानिक पत्रकारांशे बोलत होते. राज्यपाल पिल्लाई दर्शनासाठी आले असता पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी त्यांचे मंदिरात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी नगराध्यक्ष उषा नागवेकर, भगवती देवस्थानचे अध्यक्ष आदित्य देशप्रभू, सचिव जगन्नाथ देसाई, माजी नगराध्यक्ष प्रदीप देशप्रभू, श्रीधर शेणवी देसाई, उपनगराध्याक्ष मनोज हरमलकर, भाजप मंडळ अध्यक्ष तुळqिशदास गावस , धारगळ सरपंच भूषण नाईक, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, शिवराम तुकोजी, माधव सिनाई देसाई, आqिश्वनी पालयेकर, विशाखा गडेकर, तृप्ती सावळ देसाई, राखी कशाळकर, कोरगाव माजी सरपंच स्वाती गवंडी, वजरी माजी सरपंच संगीता गावकर, कृष्णा पालयेकर, गोपिचंद आपुले, रामा सावळ देसाई आदी उपस्थित होते.
आपण आज पेडणे तालुक्मयाच्या दौऱयासाठी आलो असून येथील श्री भगवती देवीचे दर्शन घेतले. आता मांदे सभागृहात काही डायलेसिस रुग्ण लाभधारकांना निधीची रक्कम देणार. शिवाय स्थानिक सरपंच, पंचायत सदस्यांशी संवाद साधणार असल्याचेही राज्यपाल पिल्लाई म्हणाले.
आपल्याला लोकांमध्ये मिसळून त्यांचे राहणीमान त्यांच्याशी संवाद साधणे आवडते. त्यामुळे आपण पूर्ण गोव्याचा दौरा करून गावा गावात जी प्रमुख मंदिरे, ऐतिहासिक स्थळे, किल्ले, चर्च आहेत त्यांचे दर्शन घेऊन पारंपारिक व्यवसाय, ऐतिहासिक वास्तू आहेत त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहे, असे राज्यपाल पिल्लाई यांनी सांगितले. श्री भगवती देवस्थानच्यावतीने अध्यक्ष आदित्य देशप्रभू यांनी राज्यपाल पिल्लाई यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान केला.
संपूर्ण गोवा दौरा करणार :राज्यपाल
गोवा हा निसर्गसंपन्न असून ही भूमी सर्वानाच भुरळ घालते. या भूमीचे दर्शन घेण्यासाठी व ग्रामीण भागातील लोकांचे जनजीवन कसे हे समजण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपण गोव्याच्या विविध भागात जात आहे. पेडणे तालुक्मयाचा दौरा आज करत आहे. असाच संपूर्ण गोवा दौरा करणार, असे राज्यपाल पिल्लाई यांनी सांqिगतले