नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातमधील लुलू ग्रुप इंटरनॅशनल कंपनी गुजरातमध्ये तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून भारतातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल उभारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सदरचा कंपनीचा मॉल हा अहमदाबादमध्ये उभारला जाणार आहे. आधुनिक सुविधांसह असणारा हा मॉल पुढच्या वर्षी सुरू होणार आहे. लुलू ग्रुपचा हा देशातील तिसरा मॉल आहे. याआधी कंपनीने कोची (केरळ) आणि लखनऊ (उत्तर प्रदेश) याठिकाणी आपला मॉल उभारला आहे. या अंतर्गत 6 हजार जणांना नोकरी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
Previous Articleजीव आणि शिव ही एकाच ईश्वराची दोन रूपे आहेत असे समज
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.