बेळगाव : लोकसभा निवडणुकीचे मतदान मंगळवारी मोठ्या चुरशीने पार पडले. या निवडणुकीत म. ए. समितीच्यावतीने महादेव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गेल्या महिन्याभरापासून सर्वत्र प्रचार केला. मंगळवारी दिवसभर वृद्ध तसेच दिव्यांग मतदारांना घरातून आणून मतदान करून घेतले. त्यामुळे धावपळ करावी लागली. गेल्या महिन्याभरापासून धावपळीमुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष झाले होते. बुधवारी त्यांनी कुटुंबासमवेतच वेळ घालविला. महादेव पाटील यांचा नाथ पै सर्कल येथे चहा विक्रीचा व्यवसाय आहे. ते दिवसभर चहाचा व्यवसाय करत असतात. याचबरोबर सामाजिक कार्यामध्येही ते नेहमीच पुढे असतात. कोणाच्याही अडचणीवेळी ते स्वत: धावून जातात. मात्र गेल्या महिन्याभरापासून या व्यवसायाकडे, तसेच सामाजिक कार्याला त्यांना वेळ देता आली नाही. आता मतदान झाल्याने यापुढे पूर्वीप्रमाणेच माझा व्यवसाय, तसेच सामाजिक कार्यामध्ये स्वत:ला वाहून घेणार आहे, असे त्यांनी सांगितले. या निवडणुकीमध्ये मराठी भाषिक, तसेच इतर समाजातील जनतेने मला चांगले सहकार्य केले आहे. त्यांचा मी शतश: ऋणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. म. ए. समितीच्या नेतेमंडळींनी व कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी अहोरात्र काम केले. त्या सर्वांचे देखील मी आभार मानत असल्याचे त्यांनी सांगितले.
Previous Articleरस्ताकाम पूर्ण; त्यानंतर पुन्हा खोदाई!
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.