वृत्तसंस्था/ मुंबई
या वर्षाच्या जून महिन्यात होणाऱ्या पहिल्या प्रिमियर हँडबॉल लिग स्पर्धेसाठी प्रख्यात उद्योगपती पुनित बालन यांच्या मालकीचा महाराष्ट्र आयर्न मॅन संघाची अधिकृत करण्यात आली आहे. भारतामध्ये हँडबॉल हा क्रीडा प्रकार दिवसेंदिवस अधिक प्रसिद्धी मिळवत आहे. त्यामुळे आता भारतात खो खो, टेबल टेनिस आणि टेनिस प्रिमियर लिग स्पर्धेच्या धर्तीवर प्रिमियर हँडबॉल लिग स्पर्धा भरवली जाणार आहे. हँडबॉल या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या संघांनी आतापर्यंत दर्जेदार कामगिरी केली आहे. पहिली प्रिमियर हँडबॉल स्पर्धा 8 ते 25 जून दरम्यान होणार असून या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळेल असा विश्वास पुनित बालन यांनी व्यक्त केला आहे.