एसयूव्हीमध्ये मिळणार प्रथमच सनरुफ ः हय़ुंडाई क्रेटाला देणार टक्कर
नवी दिल्ली
महिंद्राने आपल्या न्यू स्कॉर्पियोचे सादरीकरण केले आहे. नवीन स्कॉर्पियोचे डिझाईन बदलण्यासोबत फिचर आणि इंजिनमध्ये विशेष बदल करण्यात आले आहेत. यासोबतच नवीन स्कॉर्पियो मॉडेलला प्रथमच सनरूफसोबत सादर करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या मॉडेलच्या बुकिंगकरीता 30 जुलै 2022 पासून सुविधा सुरु होणार आहे.
‘पहिल्यांदा या, पहिल्यांदा घ्या’ अशी योजना लागू होणार आहे. एसयूव्हीची डिलिव्हरी फेस्टिव्ह सीझनमध्ये करण्यात येणार आहे. यासोबतच याची चाचणी पाच जुलैपासून सुरु होणार आहे.
2022 महिंद्रा स्कॉर्पियो-एनचे डिझाइन
नवीन एसयूव्हीमध्ये देण्यात आलेल्या एईडी डीआरएलसोबत डबल बॅरेल हेडलॅम्प, क्रोम स्लॅट्ससोबत सिग्नेचर लोगो, नवीन डिझाईन असणारी ग्रिल, लांब बॉनेट व फॉग लॅम्प असेंबली याला विशेष आकर्षक लूक देत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. एसयूव्हीची एकूण लांबी 4662एमएम, चौरस 1917 एमएम आणि उंची 1857 एमएम इतकी लांबी व रुंदी गाडीची आहे. याचा व्हीलबेस 2780 एमएम आहे.