प्रतिनिधी /मडगाव
श्री देवी महामाया कालिका संस्थान कासरपाल, डिचोली आश्विन शु. प्रतिपदा शके 1934 ते आश्विन शु. दशमी शके 1944, सोमवार दि. 26 सप्टेंबर ते बुधवार दि. 5 ऑक्टोंबर पर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मखरोत्सव तसेच ह. भ. प. शरद बुवा द. घाग (नरसोबावाडी) यांची किर्तने आयोजित करण्यात आली आहे. घाग बुवांना तबल्यावर दत्तराज शेटय़े व ऑगनवर प्रसाद गांवस साथ संगत करणार आहेत.
सोमवार दि. 26 रोजी सकाळी श्री गणेशपूजन, पुण्याहवाचन, पंचामृत अभिषेक, रूद्राभिषेक, घटस्थापना. दु. महानैवेद्य, आरती, तीर्थ-प्रसाद व समराधना. संध्याकाळी पुराण वाचन नंतर 7 वा. किर्तन सेवा व रात्री 9 वा. आरती व महाप्रसाद. मंगळवार दि. 27 रोजी सकाळी श्रींस अभिषेकादी धार्मिक विधी, दुपारी महानैवेद्य, आरती व तीर्थ-प्रसाद व समराधना. संध्याकाळी पुराण वाचन नंतर 7 वा. किर्तन सेवा व रात्री 9 वा. आरती व महाप्रसाद.
बुधवार दि. 28 रोजी सकाळी श्रींस अभिषेकादी, धार्मिक विधी, दुपारी महानैवेद्य, आरती व तीर्थ-प्रसाद व समराधना. संध्याकाळी पुराण वाचन नंतर 7 वा. किर्तन सेवा व रात्री 9 वा. आरती व महाप्रसाद. गुरूवार दि. 29 रोजी सकाळी श्रींस अभिषेकादी, धार्मिक विधी, दुपारी महानैवेद्य, आरती व तीर्थ-प्रसाद व समराधना. संध्याकाळी पुराण वाचन नंतर 7 वा. किर्तन सेवा व रात्री 9 वा. आरती व महाप्रसाद.
शुक्रवार दि. 30 रोजी नवरात्रोत्सव ललितापंचमी. सकाळी श्रींस अभिषेकादी, धार्मिक विधी, दुपारी महानैवेद्य, आरती व तीर्थ-प्रसाद व समराधना. संध्याकाळी पुराण वाचन नंतर 7 वा. किर्तन सेवा व रात्री 9 वा. श्रींचा मखरोत्सव, आरती व महाप्रसाद. शनिवार दि. 1 ऑक्टोंबर रोजी सकाळी श्रींस अभिषेकादी, धार्मिक विधी, दुपारी महानैवेद्य, आरती व तीर्थ-प्रसाद व समराधना. संध्याकाळी पुराण वाचन नंतर 7 वा. किर्तन सेवा व रात्री 9 वा. श्रींचा मखरोत्सव, आरती व महाप्रसाद.
रविवार दि. 2 रोजी सकाळी श्रींस अभिषेकादी, धार्मिक विधी, दुपारी महानैवेद्य, आरती व तीर्थ-प्रसाद व समराधना. संध्याकाळी पुराण वाचन नंतर 7 वा. किर्तन सेवा व रात्री 9 वा. श्रींचा मखरोत्सव, आरती व महाप्रसाद. सोमवार दि. 3 रोजी सकाळी श्रींस अभिषेकादी, धार्मिक विधी, दुपारी महानैवेद्य, आरती व तीर्थ-प्रसाद व समराधना. संध्याकाळी पुराण वाचन नंतर 7 वा. किर्तन सेवा व रात्री 9 वा. श्रींचा मखरोत्सव आरती व महाप्रसाद.
मंगळवार दि. 4 रोजी सकाळी श्रींस अभिषेकादी, धार्मिक विधी, दुपारी 12 वा. नवचंडी हवन, कुमारीका पूजन, महानैवेद्य, आरती व तीर्थ-प्रसाद व समराधना. संध्याकाळी पुराण वाचन नंतर 7 वा. किर्तन सेवा व रात्री 9 वा. श्रींचा मखरोतसव आरती व महाप्रसाद. बुधवार दि. 5 रोजी सकाळी श्रींस अभिषेकादी, धार्मिक विधी, दुपारी महानैवेद्य, आरती व तीर्थ-प्रसाद व समराधना. संध्याकाळी 4 वा. श्रींची पालखी व सिमोलंघन व उत्सवाची सांगता होईल.
भाविकांनी देवी महामाया कालिकेच्या नवरात्रोत्सवाला आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन पाजीफोंड मडगाव येथील उपेंद्र अच्युत रायकर यांनी केले आहे.