वृत्तसंस्था/ लंडन
एफए चषक फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर युनायटेड संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. या स्पर्धेतील झालेल्या उपांत्य सामन्यात मँचेस्टर युनायटेड शेफिल्ड युनायटेडचा 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला.
उपांत्य फेरीच्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडच्या रियाद माहरेजने शानदार हॅट्ट्रिक नोंदवली. सामन्याच्या पूर्वार्धात 42 व्या मिनिटाला अल्जेरियाच्या रियाद माहरेजने मँचेस्टर युनायटेडचे खाते उघडले. 61 व्या मिनिटाला त्याने आपल्या संघाचा आणि वैयक्तिक दुसरा गोल केला. 66 व्या मिनिटाला जॅक ग्रिलेसने दिलेल्या पासवर रियाद माहरेजने संघाचा तिसरा आणि वैयक्तिक तिसरा गोल नोंदवून हॅट्ट्रिक साधली. आता या स्पर्धेत मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटी यांच्यात अंतिम लढत 3 जून रोजी ब्रिग्टन येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेच्या इतिहासात मँचेस्टर सिटी संघ आपल्यावर गोल करवून न घेताना अंतिम फेरी गाठणारा 1966 नंतरचा पहिला संघ आहे.